Posts

Showing posts from February, 2019

शंभुराजे कृत बुधभूषण मधील निवडक श्लोक

राजाची सामान्य कर्तव्ये व्यसनानि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् । सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ॥ अर्थ:  राजाने सात दोष टाळले पाहिजेत,हे दोष पुढीलप्रमाणे आहेत वाग्दण्ड  -राजाने कठोर बोलणे टाळावे पारूष्य  - इतरांचा अपमान करणे टाळावे दुरयातंच -संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये पान -मद्यपानापासून दूर असावे स्त्री -राजांस स्त्रीचे व्यसन नसावे मृगया -गरीब प्राण्याची शिकार करू नये द्युत -जुगारापासून राजाने दुर राहावे काले मृदुर्यो भवति काले भवति दारूण: । राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥ अर्थ:  राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर राजाने कधी कठोर तर कधी मवाळ बनावे भृत्यै:  सह महीपाल: परिहासं च वर्जयेत् । भृत्या:  परिभवन्तीह नृपे हर्षवशंगतम्  ॥ अर्थ:  राजाने नोकराबरोबर थट्टा मस्करी करू नये.नोकरांच्या वेढ्यातील राजा हर्षवश होऊन नंतर तिरस्कृत होतो. छत्रपती शहाजीराजे यांचे सुबक भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:| अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||...

छत्रपती शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण व आजचे भारतीय कृषी धोरण,एक विरोधाभास !!!

स्वराज्याचा कणा शेतकरी आहे , हे  छत्रपती शिवरायां ना माहित होते , त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना त्या काळात राबविल्या . शेतकऱ्यांना सारा ( कर ) भरण्यात सवलत देणे , शेतकऱ्यांना व्याजरहित कर्ज देणे तसेच आपल्या सैनिकांपासून शेतकऱ्यांना त्रास होऊ न देण्याची जबाबदारी महाराजांनी घेतली होती . याबाबत महाराजांनी प्रभानवल्ली ( तालूका .  संगमेश्वर ,  जिल्हा . संगमेश्वर ) येथील सुभेदाराला लिहिलेले इ . स . १६७६  सालातील एक पत्र फारच महत्वपुर्ण आहे . रामाजी अनंत सुभेदाराला महाराज फर्मावितात , “ चोरी न करवी , इमाने - इतबारे साहेब काम करावे , येसी तू क्रियाच केलीच आहेस . त्येणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास ( रास्त ) व दुरूस ( दुरूस्त ) वर्तणे . या उपरि कमाविस कारभारास लावणी संचणी उगवणी जेसी जेसी जे जे वेलेस जे करू ये ते ते करीत जाणे . हर भातेने  ( तऱ्हेने ) साहेबाचा वतु  ( उत्पन्न ) अधिक होये ते करीत जाणे . मुलकात बटाईचा तह ( अधेलीचा करार ) चालत आहे ; परंतु रयेतीवर जाल ( जुलूम )  न पडता रयेतीचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आप...

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी

माझा मराठीची बोलू कौतुके।  परि अमृतातेहि पैजासी जिंके।  ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे.  लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी   कविश्रेष्ठ कुसूमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी  सर्व जगभर मराठी बांधवाकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातील सुमारे नऊ कोटी लोकांची मातृभाषा आहे.अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात,शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो.सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात(अंदाजे इ.स.पू.२२०-इ.स.२१८)मराठी भाषेची साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.सतरावा सातवाहन राजा हाल याचे "गाथासप्तशती" हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. देवगिरीच्या यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.याच कालखंडात मुकुंदराज...