शिवचरित्र कशासाठी ?

शिवचरित्र कशासाठी ?

1.शेतकरी-
शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावर्तीत करण्यासाठी व आत्मबल वाढवण्यासाठी खरी गरज आहे ती त्याना शिवचरित्र समजुन सांगण्याची,
. 2.विद्यार्थी- विद्यार्थ्यांना शिक्षण कसे व कशासाठी घ्यावे व ध्येय ठरवण्यासाठी गरज आहे त्याना बाल शिवबांच्या चरीत्राच्या अभ्यासाची,
. 3.राजकीय/सामाजिक नेते- नेतृत्व कसे करावे व कशासाठी करावे हे राजकीय/सामाजिक नेत्यांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवबांच्या नेतृत्वाच्या अभ्यासाची, .
4.सरकारी अधिकारी- अधिकार कसे वापरावे? कुठे वापरावेत? कोणासाठी वापरावेत हे सरकारी अधिकाऱ्यांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवबांच्या आदेश पत्रांच्या अभ्यासाची,
. 5.न्यायाधीश- न्याय निवाडा कसा करावा? हे न्यायाधीशांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवचरित्रातील न्याय प्रकरणाच्या अभ्यासाची, .
6.शिक्षक- शिष्यांना शिक्षण कसे द्यावे? हे शिक्षकांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवचरित्रातील जिजाऊ शहाजीराजे व संत तुकोबांच्या शिक्षण पध्दतीच्या अभ्यासाची, .
7.अभियंता-
वास्तु कशा बांधाव्यात हे अभियंत्याना समजण्यासाठी गरज आहे त्यानी शिवकालीन किल्यांचा अभ्यास करण्याची,
.
8.अर्थतज्ञ-
कर कसा अकारावा व पैसा कसा उभा करावा हे समजण्यासाठी गरज आहे अर्थतज्ञला शिवकालीन शेतसारा असुलीच्या पध्दतीच्या अभ्यासाची,
. 9.लष्कर प्रमुख-
सैन्य कसे तयार करावे? युद्ध निती कशी वापरावी व शत्रुचे खच्चीकरण कसे करावे हे लष्कर प्रमुखाला समजण्यासाठी गरज आहे शिवबांच्या गनिमीकावा व गुप्तहेर खात्याच्या अभ्यासाची,
.
10.पुरुष- आजच्या पुरुषाना गरज आहे ती शिवाजी महाराजांचा महिला विषयीचा सन्मान शिवचरित्रातुन अभ्यासण्याची,

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष