शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ३० मे

राजा शिवछत्रपती:
शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष
३० मे १६६४
जसवंतसिंह वेढा काढून दिल्लीला निघून जाताच शिवाजी राजे राजगडाहून सिंहगडावर आले. त्यांनी तो आपला अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला.
३० मे १६७४
राज्याभिषेक सोहळ्या प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला. राज्याभिषेक म्हणजे राजाचे भुमिशी लग्न. पण अभिषेका पुर्वी विवाह करावा असा धर्मसंकेत आहे. शिवकालात लग्ने बालपणीच होत असत. महाराजांना त्यांच्या वयास सांधर्म्य साधणारी मुलगी मिळणे अशक्य होते. पण म्हणून शिवरायांनी या ठिकाणी कुठल्याही लहान मुलिशी विवाह केलेला नाही. आता कळले का ? समर्थ शिवरायांना "आचारशिल - विचारशिल - सर्वज्ञ पणे सुशिल" असे का म्हणतात ? महाराज थोर विवेकी पुरूष होते
https://shivchhatrpati.blogspot.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष