मराठा आरमाराचा दरारा

मराठा आरमाराचा दरारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी महाराज गादीवर आले तेंव्हा नोव्हेंबर १६८० मध्ये संभाजी महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आपला वकील इंग्रजांकडे मुंबईस पाठवला होता शिवाय सिद्दीच्या मुंबईमधील हलचालीवर ही लक्ष ठेवण्याची तरदूत संभाजी महाराजांनी केली होती. इंग्रजांनी सिद्दीस मदत करायचे थांबवावे तसे न केल्यास संभाजी महाराज मुंबईवर स्वारी करतील असा निरोप संभाजी महाराजांच्या वकीलाने इंग्रजांना दिला यावेळी सिद्दी आपल्या आरमारासह सूरतेस गेला होता तेंव्हा इंग्रजांना सिद्दीच्या भानगडीतून थोडा दिलासा वाटला होता. पण १६८१ च्या सुमारास सिद्दिने मुंबईस जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली. चौल येथे ३००० सैन्यासह मराठा दाखल होता त्याने गलबतांची रास्त मागणी केली तेंव्हा इंग्रजांनी संभाजी महाराजांच्या भीतीने ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांकडे पाठवली.. छत्रपती संभाजी महाराजांचा आरमारातील दरारा दर्शवणारी ही घटना झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १६ मार्च १६८१ || हर हर महादेव
|| जय भवानी, जय शिवाजी....||
https://www.instagram.com/chhatrapati__shivaji_maharaj/

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष