९ जुन ऐतिहासिक दिनविशेष
आजचे ऐतिहासिक दिनविशेष
९ जुन १६८०
दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास ( अहिवंतगड ) वेढा घातला.
९ जून १६९६
छत्रपति राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले.
९ जून १७००
दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
९ जुन १७००
परळी किल्ला मोगलांना प्राप्त. २ महिने निकराचा संग्राम होऊन बादशहाचे पुष्कळ लोक जाया झाले. इकडे गडावर राजाराम मरण पावल्याची खबर आली तेव्हा गडावर ‘परशुराम त्रिंबक’ कारभार पाहत होते. राजारामाच्या मृत्यूची वार्ता ऐकून परळीच्या किल्लेदारास न विचारता परशुराम त्रिंबकने बादशहास शरणचिट्ठी लिहिली त्यामुळे धान्यसामग्री संपल्यामुळे आजच्या दिवशी ९ जुन रोजी परळीचा किल्ला मोगलांना प्राप्त झाला.
९ जून १७१८
पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले.

Comments
Post a Comment