शंभुराजे कृत बुधभूषण मधील निवडक श्लोक
राजाची सामान्य कर्तव्ये व्यसनानि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् । सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ॥ अर्थ: राजाने सात दोष टाळले पाहिजेत,हे दोष पुढीलप्रमाणे आहेत वाग्दण्ड -राजाने कठोर बोलणे टाळावे पारूष्य - इतरांचा अपमान करणे टाळावे दुरयातंच -संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये पान -मद्यपानापासून दूर असावे स्त्री -राजांस स्त्रीचे व्यसन नसावे मृगया -गरीब प्राण्याची शिकार करू नये द्युत -जुगारापासून राजाने दुर राहावे काले मृदुर्यो भवति काले भवति दारूण: । राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥ अर्थ: राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर राजाने कधी कठोर तर कधी मवाळ बनावे भृत्यै: सह महीपाल: परिहासं च वर्जयेत् । भृत्या: परिभवन्तीह नृपे हर्षवशंगतम् ॥ अर्थ: राजाने नोकराबरोबर थट्टा मस्करी करू नये.नोकरांच्या वेढ्यातील राजा हर्षवश होऊन नंतर तिरस्कृत होतो. छत्रपती शहाजीराजे यांचे सुबक भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:| अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||...