Posts

Showing posts from June, 2018

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १२ जून १६४९ चाकण प्रांत व संग्रामदुर्ग किल्ला स्वराज्यात दाखल झाला. १२ जून १७३२ सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली १२ जून १८९६ इंग्रज अधिकारी लाँर्ड लँमिंग्टन याने किल्ले रायगड ला भेट दिली.  ➖

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष ११ जून १६७४ - छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ऑक्सेंटनला भेटण्याची परवानगी दिली. हेन्री ऑक्सेंटन राज्याभिषेका पूर्वी रायगडावर दाखल झालेला होता. व्यापारासंबंधी तहावर सह्या करण्यास तो आतुरला होता. आणी राज्याभिषेकाआधीच करार ठरावा असे टुमणे निराजी मार्फत त्याने लावले होते. पण महाराजांनी त्याची दाखल अजिबात घेतली नाही राज्याभिषेकानंतर ही ४ दिवस राजांनी त्यांना ताटकळत ठेवले.

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

आजचे ऐतिहासिक दिनविशेष १० जून १६६४ विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम आल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जून १६७६ छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात. राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जून १६८१ औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जुन १६८३ फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जून १७६८ पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.

९ जुन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे ऐतिहासिक दिनविशेष ९ जुन १६८० दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास ( अहिवंतगड ) वेढा घातला. ९ जून १६९६ छत्रपति राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले. ९ जून १७०० दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला. ९ जुन १७०० परळी किल्ला मोगलांना प्राप्त. २ महिने निकराचा संग्राम होऊन बादशहाचे पुष्कळ लोक जाया झाले. इकडे गडावर राजाराम मरण पावल्याची खबर आली तेव्हा गडावर ‘परशुराम त्रिंबक’ कारभार पाहत होते. राजारामाच्या मृत्यूची वार्ता ऐकून परळीच्या किल्लेदारास न विचारता परशुराम त्रिंबकने बादशहास शरणचिट्ठी लिहिली त्यामुळे धान्यसामग्री संपल्यामुळे आजच्या दिवशी ९ जुन रोजी परळीचा किल्ला मोगलांना प्राप्त झाला. ९ जून १७१८ पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दि...

८ जून आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष  ८ जून १६४९ छत्रपती शिवरायांनी चाकणचा संग्रामदुर्ग घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ८ जून १६६६ आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठविण्यास सुरूवात केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩  ८ जून १६७० पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुन्हा जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ८ जून १७०७ औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩  ८ जून १७१३ पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

५ जून शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

|| आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ||🚩 ५ जून १६५९ आदीलशाही सरदार अफझलखानास छत्रपती शिवरायांनी मोठ्या बहादूरीने ठार केल्याची वार्ता औरंगजेब बादशहाला समजली. तेव्हा त्याने शिवरायांना मानाचा पोशाख आणि पत्र पाठवले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏇 🏇 🏇 🏇 🏇 🏇 ५ जून १६६६ आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏇 🏇 🏇 🏇 🏇 ५ जून १६६६ आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग" याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳ 🏇 ५ जून १६७२ युवराज संभाजीराजेंनी स्वतंत्रपणे मोहीम सुरू करून "जव्हार" परगणा जिंकून मुक्त केला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏇 "जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव https://shivchhatrpati.blogspot.com/?m=...

शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष 3 जून

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ३ जून १६७३ शिवाजी महाराज व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ३ जून इ.स. १६७४ छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले.

शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष२ जून

राजा शिवछत्रपती: आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩 २ जून १६६४ छत्रपती शिवराय किल्ले कोंढाणा(सिंहगड)किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा महाराजांनी मानसन्मान केला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 २ जून १६६५ किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 २ जून १६७४ छञपती शिवरायांनी राजाभिषेकापूर्वी नक्षञयञ आणि उत्तरपूजन विधी केले. 🚩🏇🏻 https://shivchhatrpati.blogspot.com/?m=1

शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष 1 मे

राजा शिवछत्रपती: आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशे ष🚩 राजा शिवछत्रपती: आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🚩 १ जून १६७४ छत्रपती शिवरायांनी राजाभिषेक सोहळ्यापूर्वी आजच्या दिवशी दानधर्म केला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ १ जून १६७६ छत्रपती शिवराय किल्ले रायगडवर परतले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 " जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव !! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 https://shivchhatrpati.blogspot.com/?m=1