Posts

Showing posts from May, 2018

शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ३० मे

राजा शिवछत्रपती: शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ३० मे १६६४ जसवंतसिंह वेढा काढून दिल्लीला निघून जाताच शिवाजी राजे राजगडाहून सिंहगडावर आले. त्यांनी तो आपला अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला. ३० मे १६७४ राज्याभिषेक सोहळ्या प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला. राज्याभिषेक म्हणजे राजाचे भुमिशी लग्न. पण अभिषेका पुर्वी विवाह करावा असा धर्मसंकेत आहे. शिवकालात लग्ने बालपणीच होत असत. महाराजांना त्यांच्या वयास सांधर्म्य साधणारी मुलगी मिळणे अशक्य होते. पण म्हणून शिवरायांनी या ठिकाणी कुठल्याही लहान मुलिशी विवाह केलेला नाही. आता कळले का ? समर्थ शिवरायांना "आचारशिल - विचारशिल - सर्वज्ञ पणे सुशिल" असे का म्हणतात ? महाराज थोर विवेकी पुरूष होते https://shivchhatrpati.blogspot.com/?m=1

शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २९ मे

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 🚩 ⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽 २९ मे १६७४ : शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न. राजांची तुला करण्यासाठी १६००० होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे तर डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो हाच दिवस होता 🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏇🏇🏇 २९ मे १६५८ :-  औरंगजेबाला दिल्ली चे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली . या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता . त्याचे नाव शेख मीर . हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला . या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले . ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे . त्या लढाईची तारीख होती. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

शिव कालीन दिनविशेष 28 मे

🚩 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 🚩 २८ मे १६६४ सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता. ५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 🚩 🏇 🚩  २८ मे १६६४ महाराजा जसवंतसिंहाने सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या सर्व सैन्याला परत निघण्याचा आदेश देऊन तळ सोडला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇 🚩 🏇 🚩 🏇  २८ मे १६६८ शिवाजी महाराजांचा व फिरंग्यांचा कुडाळ येथे तह झाला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩   २८ मे १६८७ गोवळकोंड्याचा वेढा चालू असताना 'शेख निजाम...

शिव_दिनविशेष २६ मे

# आजचे_शिव_दिनविशेष ******************** २६ मे इ.स.१६४२ "शिवा जंगम" या गृहस्थास बाल शिवबाने रायरेश्वर येथील महादेव मंदीरात दैनंदीन पूजेसाठी नेमले. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 २६ मे इ.स.१६७४ इंग्रज अधिकारी आॅक्झेंडन याने रायगडावर छत्रपती शिवरायांना मौल्यवान किमती नजराना पेश केला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 २६ मे इ.स.१७३३ "पेशवे थोरले बाजीराव" यांनी "आबाजीपंत पुरंदरे" यांना 'सिद्दी' संदर्भात पत्र लिहले. पत्रात ते म्हणतात, 'सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत, १ अंजनवेली तर २ उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर सरखेल उंदेरीस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आल्यावर यांची किंमत कमी होईल आणी आसराही तुटेल'. 🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻   जय जगदंब जय जिजाऊ   जय शिवराय जय शंभूराजे             जय गडकोट         !! हर हर महादेव !! 🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩 https://shivchhatrpati.blogspot.in/?m=1

शंभू चरित्र

|| शंभू चरित्र || शंभू चरित्र भाग २२ ३ एप्रिल १६८० शिवरायांच निधन झालं. त्यावेळी संभाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याला आलेत. ते रायगडावर न्हवते याच कारण! ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीत अडकले होते. राजारामाचं लग्नं ते स्वारीत असतानाच झालं. म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत वगैरे अजिबात न्हवते. हि वस्तुस्थिती आहे. आणि शिवरायांच निधन झाल्यावरं शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तरं रायतेतं गोंधळ माजेल आणि शत्रू आक्रमणं करायची भीती आहे. म्हणून शिवरायांच्या निधनाची वार्तासुद्धा गोपनीय ठेवण्यात आली. पण! त्याचवेळी मंत्री रायगडावर जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरु झाला. कसंही झालं संभाजीराजे गादीवर येत उपयोगाचे नाहीत. कारण! संभाजीराजे "धर्मपंडित", "संभाजी संस्कृत चे ज्ञानी", "संभाजी निर्णय क्षमता असणारे", "संभाजी प्रचंड बुद्धिमान", "संभाजी प्रचंड शौर्यशाली". संभाजी जरं गादीवर आले तरं अत्ताच ते आपला मुलायजा ठेवत नाहीत, पुन्हा तरं आपल्यालाच ठेवणार नाहीत. त्यामुळे कसल्याही परीस्थितीत संभाजी गादीवर येत कामाच नयेत. त्यापेक्षा राजारामा...

शिव-दिनविशेष 24 मे

🚩आजचे शिव-दिनविशेष🚩 24 मे 1648 स्वराज्याचे पहिले सरसेनापती " वीर बाजी पासलकर " स्मृतीदिन. आदिलशहा सरदार "फत्तेखान" सोबत "खळद-बेलसर" येथे झालेल्या लढाईत "वीर बाजी पासलकर" हे धारातीर्थी पडले. ही लढाई मराठ्यांनी जिंकली, माञ बाजी पासलकरांसारखा वीर मराठ्यांनी गमावला. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 24 मे 1673 "किल्ले रायगड" वर " युवराज संभाजीराजे " आणि "थाँमस निकल्सन" यांची भेट झाली. 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 "जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! हर हर महादेव !! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शिवराज्याभिषेक सोहळा

Image
०५ व ०६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा २०१८ कार्यक्रम पत्रिका व माहीतीपत्र. *नक्की वाचा बर का महत्वाचे आहे.* महत्वाची सुचना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येताना कोनत्याही प्रकारचे प्लास्टिक आणु नये गडाचे पावित्र्य खराब होईल आसे कृत्य करु नये. शिवराज्याभिषेक सोहळा..! रायगड विकास प्राधिकरण आयोजित दि.५जून आपन शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येताणा स्वतःचे ताट वाटी आणल्यास रायगडावर पत्रावळीचा कचरा होणार नाही.येताणा पाणी पिण्यासाठी धातूची बाटली आणावी.जेणेकरुन आपन कचरा कमी करण्यासाठी मदत करू. आपन शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार आसल्यास शक्यतो ५ जुन ला रायगडावर यावे कारण शिवभक्तांच्या गर्दी व ट्रॅफिक मुळे ६ जुनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोहोचण्यास अडचण होऊ शकते. स्वच्छता मोहीम मधे सहभागी होणार्यांनी ०४ जुन ला यावे. उत्खनन चालु असलेल्या ठिकाणी हात लाऊ नये व गडावरील मनोरे किंवा भिंतीवर चढुन किंवा बसु नये.  शिवराज्याभिषेक कार्यक्रम वेळापत्रक ५ जुन स ७ वाजता : रायगड विकास प्राधिकरण आयोजीत दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीमेच सुरुवात, स्थळ-चित्त दरवाजा. दु १२ वाजता : स्वच्छता मोहीम समा...

येसाजी कंक

येसाजी   कंक जेव्हा छत्रपती शिवराय हे राज्याभिषेकानंत र दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी कुतुबशहाशी हातमिळवणी केली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की”मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?”त्याबदल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की”स्वराज्याच्या सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो.”तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले. येसाजी शांतपणे मैदानातून वर आला.शामियान्यात येवून त्याने मुजरा केला.घामाने डवरलेल्याराजांनी येसाजीला मिठी मारली,आपल्या हातातील रत्नखचित सलकडी येसाजीच्या हाती घातली.काही न बोलता राजे परत बसले.तानाशहानी येसाजीवर देणग्यांची खैरात केली.येसाजी कुतुब्शाहीच्या दरबारी राहील,तर पंचहजारांची मनसब द्यायला कुतुबशहा तयार झाले.येसाजी मुजरा करून म्हणाला,”मी महाराजांचे अन्न खातो.ते आपलच आहे त्यापेक्षा जहागिरी का जास्त आहे?”त्या उत्तराने तानाशहा आणखीन खुश झाले.ते राजांना म्हणाले,’महाराज,हा तुमचा माणूस आम्हांला द्या’रा...

कान्होजी आंग्रे

कान्होजी   आंग्रे सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमार प्रमुख’! स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी, कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म १६६९ मद्धे रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे या गावी झाला.पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव, कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले.कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.   ...

स्वराज्यातील पहिले धरण

Image
                        स्वराज्यातील पहिले धरण छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या आंबील ओढ्यावर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली.. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील ओढ्यास जाउन मिळते.. व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूर चे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते. येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबा चे धरण म्हणतात.. २००५ - २००७ च्या दरम्यान शिवापूर गावावर असलेल्या दुष्काळाच्या दरम्यान गावकऱ्यांना या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले, पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही शिवापूर गावच्या शेतीस...

मराठा आरमाराचा दरारा

Image
मराठा आरमाराचा दरारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी महाराज गादीवर आले तेंव्हा नोव्हेंबर १६८० मध्ये संभाजी महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आपला वकील इंग्रजांकडे मुंबईस पाठवला होता शिवाय सिद्दीच्या मुंबईमधील हलचालीवर ही लक्ष ठेवण्याची तरदूत संभाजी महाराजांनी केली होती. इंग्रजांनी सिद्दीस मदत करायचे थांबवावे तसे न केल्यास संभाजी महाराज मुंबईवर स्वारी करतील असा निरोप संभाजी महाराजांच्या वकीलाने इंग्रजांना दिला यावेळी सिद्दी आपल्या आरमारासह सूरतेस गेला होता तेंव्हा इंग्रजांना सिद्दीच्या भानगडीतून थोडा दिलासा वाटला होता. पण १६८१ च्या सुमारास सिद्दिने मुंबईस जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली. चौल येथे ३००० सैन्यासह मराठा दाखल होता त्याने गलबतांची रास्त मागणी केली तेंव्हा इंग्रजांनी संभाजी महाराजांच्या भीतीने ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांकडे पाठवली.. छत्रपती संभाजी महाराजांचा आरमारातील दरारा दर्शवणारी ही घटना झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १६ मार्च १६८१ || हर हर महादेव || जय भवानी, जय शिवाजी....|| https://www.instagram.com/chhatrapati__shivaji_...

प्रतापगड

Image
प्रतापगड किल्ल्याची उंची : ३५५६ फूट किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग डोंगररांग : सातारा – महाबळेश्वर चढाईची श्रेणी: सोपी जिल्हा : सातारा तालुका: महाबळेश्वर इतिहास – छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले. निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता. इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स. १६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.गडावरील पाहण्यासारखी ठिकाणेवाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेल...

🚩मावळा कसा असावा🚩

Image
🚩मावळा कसा असावा🚩  स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले आणि त्यात खारीचा वाटा होता तो म्हणजे त्यांचे सहकारी आणि मावळ्याचा. एक मावळा लाख मावळ्यांसारखा होता. महाराजांसाठी एक एक मावळा स्वतःचे जिव द्यायला सुध्दा मागे पुढे बघत नसत. पावनखिंडीतील बाजीप्रभु देशपांडे यांचा पराक्रम आपल्याला माहित आहेच. फक्त ६०० मावळ्यांनी खिंड रोखून ठेवली होती आणि तेही १५००० गनिमांसमोर. केवढे ते शौर्य आणि निस्सीम स्वामीभक्ती! आणि बाजीप्रभुंच्या मनात तर एकच ध्यास होता, 'जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही, तोपर्यंत मी लढणार!' आणि शेवटी विशालगडावरून तोफांचा आवाज झाल्यावरच बाजी थांबले. पण ते कामी आले. काय बोलाव याला? काही शब्दच फुटत नाहीत...!! कधीही मावळ्याच्या मुखातून नाही असा शब्द निघत नसे. त्यांना वाटे कधी मोहिम निघेल आणि कधी मोहीम फतेह करू. शिवाजी महाराजांच्या सारखे असे कोणतेच राजे होऊन नाही गेले ज्यांच्या सैन्यात आपापसात स्पर्धा होत असतील. मोहिम निघाली कि तानाजींसारखे मावळे येत आणि बोलत, 'ही मोहिम म्या करणार मला द्या आत्ता फतेह करतो' तेवढ्यात दुसरे मावळे येत आणि मोहिमेची ज...

शिवचरित्र कशासाठी ?

Image
शिवचरित्र कशासाठी ? 1.शेतकरी- शेतकऱ्यांना आत्महत्या पासून परावर्तीत करण्यासाठी व आत्मबल वाढवण्यासाठी खरी गरज आहे ती त्याना शिवचरित्र समजुन सांगण्याची, . 2.विद्यार्थी- विद्यार्थ्यांना शिक्षण कसे व कशासाठी घ्यावे व ध्येय ठरवण्यासाठी गरज आहे त्याना बाल शिवबांच्या चरीत्राच्या अभ्यासाची, . 3.राजकीय/सामाजिक नेते- नेतृत्व कसे करावे व कशासाठी करावे हे राजकीय/सामाजिक नेत्यांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवबांच्या नेतृत्वाच्या अभ्यासाची, . 4.सरकारी अधिकारी- अधिकार कसे वापरावे? कुठे वापरावेत? कोणासाठी वापरावेत हे सरकारी अधिकाऱ्यांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवबांच्या आदेश पत्रांच्या अभ्यासाची, . 5.न्यायाधीश- न्याय निवाडा कसा करावा? हे न्यायाधीशांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवचरित्रातील न्याय प्रकरणाच्या अभ्यासाची, . 6.शिक्षक- शिष्यांना शिक्षण कसे द्यावे? हे शिक्षकांना समजण्यासाठी गरज आहे त्याना शिवचरित्रातील जिजाऊ शहाजीराजे व संत तुकोबांच्या शिक्षण पध्दतीच्या अभ्यासाची, . 7.अभियंता- वास्तु कशा बांधाव्यात हे अभियंत्याना समजण्यासाठी गरज आहे त्यानी शिवकालीन किल्यांचा अभ्यास करण्य...